मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आज दोन तासासाठी पुर्णपणे बंद

( म विजय)

पुणे – महामार्ग पोलीस विभागाच्या वतीने यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आज (दि.९) दुपारी १२ ते दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान पुर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची माहिती राज्य वाहतूक विभागामार्फत देण्यात आली आहे.

दोन तासासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग बंद राहणार असल्याने अनेकांचे हाल होणार आहेत.

त्यादरम्यान सर्व प्रकारची अवजड व मालवाहतुक करणारी वाहने द्रुतगती मार्गावरील कि.मी. 85/500 या ठिकाणी थांबविण्यात येणार आहे. हलकी चारचाकी व इतर प्रवाशी वाहने ही द्रुतगती मार्गावरील किवळे ब्रिज येथून जुना मुंबई-पुणे महामार्ग (NH-4) ने मुंबईकडे वळविण्यात येणार आहे. वाहन चालकांनी याची नोंद घेवुन महामार्ग पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन पुणे विभागाचे पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी केले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email