मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढणारे मनसे नेते नितीन नांदगावकरांना नोटीस मुंबईतून दोन वर्षांसाठी तडीपार करू!

मुंबई दि.२१ – सर्वसामान्यांना लुटणारे रिक्षाचालक असो, मराठी माणसांची फसवणूक करणारे बिल्डर असो, मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्व म्हणून मनसेचे नितीन नांदगावकर गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. महाराष्ट्रातील सामाजिक कार्यातही ते पुढे असतात. त्यांच्या वेगळ्या स्टाइलनं ते मुजोर रिक्षाचालकांपासून रस्त्यांवरून नियमांचे पालन न करता गाडी चालवणाऱ्या चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे जनतेतही ते लोकप्रिय आहेत. आता पोलिसांनी त्यांच्याविरोधात तडीपारीची नोटीस बजावली आहे. परंतु पोलिसांच्या या तडीपारीच्या नोटिसीविरोधात मुंबईकर एकवटले असून, सोशल मीडियावरूनही त्यांच्यावर रोष व्यक्त केला जातो. मराठी माणसांना लुबाडणा-या, त्रास देणा-यांना आपल्या हटके शैलीत फटकावणा-या नांदगावकरांची लोकप्रियता आता त्यांच्याच मुळावर उठली आहे.

हेही वाचा :- डोंबिवलीत ; तरुणवर्गात घटस्फोटाचे प्रमाण वाढतय असून यात तरुण विवाहित मुलींचे प्रमाण अधिक…

नांदगावकर यांच्यापासून मुंबईकरांच्या जीवाला धोका असून अनेक जण भयभीत झाले आहेत, असा ठपका ठेवत मुंबई पोलिसांनी नांदगावकरांना नोटीस बजावली आहे. करण्यात आलेल्या आरोपांबाबत आपले म्हणणे मांडा, अन्यथा मुंबईतून दोन वर्षांसाठी तडीपार करू, असा इशारा मुंबई पोलिसांनी नोटीसद्वारे दिल्याचे नितीन नांदगावकर यांनी स्पष्ट केले आहे. नितीन नांदगावकर हे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस आहेत, नितीन नांदगावकर यांनी मराठी माणसाच्या प्रश्नांसाठी नेहमीच लढा दिला आहे. त्यांच्या स्टाईलने न्याय मिळवून देण्याचे काम ते सदोदित करत असतात. नितीन नांदगावकर हे गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आठवड्यातील दर बुधवारी ‘जनता दरबार’ भरवतात, नितीन नांदगावकर यांच्या जनता दरबारात न्याय मागण्यासाठी देश-विदेशातील असंख्य लोक गर्दी करतात. यापूर्वी असा ‘जनता दरबार’ कै. आनंद दिघे भरवत असत, पण त्यांच्या निधनामुळे ‘जनता दरबार’ बंद झाला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email