टिकटॉक ला Ban करण्याची मागणी ; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

मुंबई दि.११ :- सोशल मीडियावर सध्या सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या व तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉक अ‍ॅपविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. टिकटॉक अ‍ॅप पमुळं मुलांवर वाईट संस्कार होतात, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. ही याचिका दाखल करणारी महिला मुंबईतील असून तिचे नाव हिना दरवेश असं आहे. याचिका दाखल करताना हिना या गृहिणीने टिकटॉकचा वापर केल्याने मुलांवर वाईट संस्कार होतात, असा दावा करत टिकटॉक अ‍ॅपवर बंदी आणण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. या अ‍ॅपमध्ये अश्लील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे त्याचा वाईट परिणाम मुलांवर होतो. हिना दरवेश यांनी वकील अली काशिफ खान यांच्यामार्फत ही याचिकेवर हायकोर्टात दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

गुगल प्ले स्टोअर म्हणते…

गुगल प्ले स्टोअरवर टिक-टॉकची ओळख Short videos for you अशा शब्दांत करून देण्यात आली आहे. टिक-टॉक हे साधंसुधं अ‍ॅप नाही. यात कसलंही बनवेगिरी नाही. जे काही असतं ते वास्तव असतं. याला कुठलीही मर्यादा नाही. तुम्ही सकाळी ब्रश करत असाल, नाश्ता करत असाल. काहीही करत असाल. टिक-टॉकवर येऊन जगाला याची माहिती देऊ शकता.

हेही वाचा :- Live updates हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन: बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणार – भुजबळ

टिक-टॉक वापरण्यासाठी वयाची अट आहे का?

१३ वर्षांवरील व्यक्तीनेच टिक-टॉक अ‍ॅप वापरावं असं कंपनीचं सांगणं आहे. कॉमन सेन्स मीडियाच्या मते, टिक-टॉकवरील कंटेट पाहता १६ वर्षे व त्यावरील वयाच्या व्यक्तीनंच हे अ‍ॅप वापरणं योग्य आहे.

हेही वाचा :- Kalyan ; अपहरणाचे दोन गुन्हे दाखल

कोणत्या कंपनीचं आहे हे अ‍ॅप?

‘बाइट डान्स’ नामक चिनी कंपनीनं २०१६ साली हे अ‍ॅप लाँच केलं आहे. या अ‍ॅपची लोकप्रियता झपाट्यानं वाढत असून ऑक्टोबर २०१८ मध्ये अमेरिकेत हे अ‍ॅप सर्वाधिक डाउनलोड होणारं अ‍ॅप ठरलं आहे.

हेही वाचा :- आता लक्ष्य रामराज्याचे !

टिक-टॉक अॅप सुरक्षित आहे का?

सोशल मीडियावरील कोणतंही अ‍ॅप वापरणं धोकादायक असू शकतं. लहान मुलांनी मोठ्या माणसांच्या देखरेखीखालीच हे अ‍ॅप वापरायला हवं. टिक-टॉक अकाउंटसाठी तुम्ही साइन अप केल्यावर आपोआपच तुमची बरीच माहिती जगजाहीर होत असते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email