महावितरणचे जनसंपर्क अधिकारी मोहन दिवटे याना पीएच.डी. जाहीर

( म. विजय )

नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विदयापीठाच्या वतीने महावितरणचे जनसंपर्क अधिकारी मोहन शिवाजी दिवटे यांना वृत्तपत्रविदया आणिजनसंवाद शाखेतंर्गत ‘मराठवाडयातील महत्वाच्या विविध आस्थापनामधील जनसंपर्काची भूमिका’ या विषयात पीएच.डी. जाहीर करण्यात आली.विदयापीठातर्फे या बाबतचे नोटीफिकेशन जारी करण्यात आले आहे.

संशोधन मार्गदर्शक डॉ. सुधीर इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडयातील महत्वाच्या विविध आस्थापनामधील जनसंपर्काची भूमिका या विषयावर मोहन दिवटे यांनी प्रबंध सादर केला होता. प्रस्तूत विषयावर दि.14 सप्टेंबर 2019 रोजी विदयापीठात व्हायवा झाला. विदयापीठाने प्रबंध स्वीकारुन जारी केलेल्या नोटीफिकेशनव्दारे त्यांना पीएच.डी. जाहीर केली आहे.

यासाठी विदयार्थीप्रिय प्राध्यापक व जनसंपर्कतज्ञ प्रा. सुरेश पुरी,महावितरणचे जनसंपर्क सल्लागार पी.एस.पाटील,  नांदेडच्या पिपल्स महाविदयालयातील इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. डी.एन.मोरे,  एमआयटी लातूरचे डॉ. हनुमंत कराड, डॉ. नामदेव सानप, डॉ. बालाजी शिंदे, डॉ. एल.एच कांबळे, डॉ. संजय मोरे, यशवंत विधी महाविदयालयाचे सेवानिवृत्त ग्रंथपाल चंद्रकांत जटाळ, महावितरणचे जनसंपर्क अधिकारी धनंजय पवार, विकास पुरी, श्रीधर घुले, रघुनाथ पाटील रातोळीकर, सेवानिवृत्त माहिती अधिकारी वसंत कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.

मोहन दिवटे यांच्या या यशाबदल महावितरणचे मुख्य अभियंता आर. आर. कांबळे यांच्यासह इतर अधिकारी- कर्मचारी व मित्र परिवाराकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email