कल्याणात माँब लिंचिंग?पाच जनांच्या टोळक्याने एकाला हातपाय बांधून जीवे ठार मारले

( बालकृष्ण मोरे )

कल्याण दि.०८ – कल्याणात एकाची हत्या पाच जणांच्या टोळक्याने मारहाण करून हातपाय बांधून केली असून हा प्रकार माँब लिंचिंग असल्याचे दिसून येत आहे.हत्या करण्यात आलेला इसम हा चोरी करण्या साठी आला असल्याच्या संशया हून त्याची हत्या करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. हत्या झालेला इसम हा फिरस्ता असून या फिरस्त्याची हत्या करणाऱ्या ५ जणांना अवघ्या काही तासातच पोलिसांनी अटक केली आहे.हा माँब लिंचिंगा प्रकार असल्याचे या प्रकरणी बोलले जात आहे. देशात माँब लिंचिंगचे प्रकार वाढत असताना आणखी एक घटना कल्याणात समोर आल्याने खळबळ माजली आहे. हात पाय बांधलेल्या अवस्थेत एकाचा मृतदेह कल्याण स्टेशनला रस्त्या नजीक मिळाल्याने एकच खळबळ उडाली होती.

हेही वाचा :- Thane ; कारवाई टाळण्यासाठी वाहनाला स्वत:चेच ‘जॅमर’

ही हत्या करणाऱ्या ५ जणांना अवघ्या काही तासातच अटक करण्यात महात्मा फुले पोलिसांना यश आले आहे. या मारहाणीचा सर्व घटना सीसी टिव्हीत कैद झाली असून सीसी टीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी मारेकऱ्याना अटक केली आहे. कल्याण स्टेशन नजीक असलेल्या खाजगी पे अंड पार्किंग येथे मंगळवारी सकाळी एकाचा हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. परिमंडळ ३ च्या महात्मा फुले पोलीस स्थानकाच्या गुन्हे अन्वेषण विभागाने हा इसम फिरस्ता जोगोला बुधवा लोहारा (४८) हा असल्याची त्यांच्या मृतदेह असल्याची ओळख पटविली आहे. त्या अनुषंगाने तपासाची सूत्र हलवीत अज्ञात कारणाने हत्या करणाऱ्या संदेश जाधव, नवनाथ राठोड, मंगल उर्फ मंगेश हमाल, अनिस शेख, नूरआलम उर्फ राजू झिपर्या, पोपट मामा यांना अवघ्या काही तासांतच अटक केले असल्याची माहिती महात्मा फुले पोलीस स्टेशनचे व.पो.नि. प्रकाश लोंढे यांनी दिली.

Mumbai, Bandra के MTNL ऑफिस में भीषण आग, 100 से अधिक लोगों के फंसे होने की सूचना।
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email