उद्धव ठाकरेंच्या टीकेला ‘मनसे’ उत्तर; मुख्यमंत्रीसाहेब, आधी वांद्रेतील घुसखोरांचे मोहल्ले साफ करा
Hits: 1
मुंबई :- बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना मुंबईतून हाकलवून लावण्याचा पवित्रा हाती घेतलेल्या मनसेने मुंबईत ठिकठिकाणी पोस्टरबाजी केली आहे. या मोर्चाची जय्यत तयारी मनसेकडून केली जात आहे. येत्या ९ फेब्रुवारीला मोर्चाचं आयोजन आहे. मात्र मनसेच्या मोर्चावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टीका केली होती. घुसखोरांना हाकला ही भूमिका बाळासाहेबांची आहे त्यामुळे उगाच श्रेय घेऊ नये असा टोला राज ठाकरेंना लगावला होता.
हेही वाचा :- Dombivali ; फरार लुटारू 2 वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात
उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेचा समाचार घेण्यासाठी मनसेचे उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी थेट मातोश्रीच्या अंगणात पोस्टरबाजी करत मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान दिलं. वांद्रेच्या मातोश्री कलानगर भागात मनसेकडून हे पोस्टर्स झळकविण्यात आले आहेत. यामध्ये लिहिलं आहे की, माननीय मुख्यमंत्रीसाहेब पाकिस्तान आणि बांग्लादेशी घुसखोरांना हाकलंलच पाहिजे हीच आपली भूमिका असेल तर प्रथम वांद्रेतील अंगणात घुसखोरांनी भरलेले मोहल्ले साफ करा असं आव्हान देण्यात आलं आहे.