कल्याण डोंबिवलीच साडेसहा हजार कोटींचं पॅकेजचं काय झालं? – राज ठाकरे
Hits: 1
कल्याण दि.१३ :- मागील निवडणुकीवेळी भाजपची घोषणा होती, कुठे नऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? आज तोच प्रश्न आम्ही त्यांना विचारतोय कल्याण महापालिका निवडणुकीवेळी मुख्यमंत्री कल्याण डोंबिवलीला साडेसहा हजार कोटींचं पॅकेज देऊ म्हणाले होते. त्या पॅकेजचं पुढे काय झालं? ते पैसे गेले कुठे? असे प्रश्न मनसे प्रमुख राज ठाकरेंनी कल्याणमधील सभेत उपस्थित केले.
हेही वाचा :- रस्ता नाही यमदेव! खड्डा चुकवताच ट्रकने पादचाऱ्याला उडवलं
मुख्यमंत्र्यांच्या घोषणा म्हणजे धापाच असल्याचा टोला त्यांनी लगावला. यावेळी राज यांनी आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शिवस्मारक या मुद्द्यांवरुन सरकारवर जोरदार टीका केली. सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा चीनवरुन मागवला. मग आता महाराजांच्या स्मारकासाठी शिल्पकारदेखील चीनमधूनच मागवणार का, अशा प्रश्न राज यांनी विचारला.
हेही वाचा :- आरटीओ कल्याणचे अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीच्या कामात
अरबी समुद्रात शिवरायांचं स्मारक उभारण्याची टूम काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारनं काढली होती. यानंतर राज्यात भाजपा, शिवसेनेचं सरकार आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे समुद्रात गेले. त्यांनी पाण्यात काहीतरी टाकलं आणि म्हणाले स्मारक इथे होणार. त्या स्मारकाचं पुढे काय झालं? ज्या ठिकाणी जलपूजन झालं, ती जागा आता मोदी, फडणवीस आणि उद्धव यांच्यातला एक जण तरी दाखवू शकतो का, असा सवाल राज यांनी उपस्थित केला.