आता खाणींमध्ये महिलांना रोजगाराच्या समान संधी
नवी दिल्ली, दि.०४ – खाण कायदा 1952 च्या कलम 83 (1) अंतर्गत केंद्र सरकारने महिलांना जमिनीवरील आणि जमिनीखालील खाणींमध्ये काही अटींवर काम करण्याची परवानगी दिली आहे. जमिनीवरील खाणीत काम करणाऱ्या महिलांना रोजगार देण्याबाबत – खाणीचा मालक महिलांना संध्याकाळी 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कामावर ठेऊ शकतो. महिलांची नियुक्ती त्यांच्या लेखी परवानगीनंतरच केली जाईल. अशा प्रकारे नियुक्ती करण्यात आलेल्या महिलांना पुरेशा सुविधा आणि संरक्षण व आरोग्य सुविधा पुरवल्या जाव्यात मुख्य खाण निरीक्षकाद्वारे वेळोवेळी जारी मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे मानक संचलन प्रक्रिया लक्षात घेऊन महिलांची नियुक्ती केली जावी किमान 3 महिलांना एका पाळीत (शिफ्ट) नियुक्त केले जाईल.
हेही वाचा :- आपत्ती जोखीम व्यवस्थापनाबाबत इंडियन ओशन रिम असोसिएशनची उद्यापासून बैठक
जमिनीखालील खाणीत काम करणाऱ्या महिलांना रोजगार देण्याबाबत खाण मालक महिलांना सकाळी 6 ते संध्याकाळी 7 दरम्यान तांत्रिक, निरीक्षण आणि व्यवस्थापन काम देऊ शकतो जिथे सतत उपस्थित राहण्याची आवश्यकता नसेल. महिलांच्या लेखी परवानगीनंतरच त्यांची नियुक्ती केली जावी. अशा प्रकारे नियुक्ती करण्यात आलेल्या महिलांना पुरेशा सुविधा आणि संरक्षण व आरोग्य सुविधा पुरवल्या जाव्यात. मुख्य खाण निरीक्षकाद्वारे वेळोवेळी जारी मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे मानक संचलन प्रक्रिया लक्षात घेऊन महिलांची नियुक्ती केली जावी. किमान 3 महिलांना एका पाळीत (शिफ्ट) नियुक्त केले जाईल. यापूर्वी खाणीत महिलांना संध्याकाळनंतर काम करायला बंदी होती. विविध महिला कामगार गट, उद्योग जगत आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी खाणीत महिलांना रोजगाराच्या समान संधी देण्याची मागणी वेळोवेळी केली होती. विविध मंत्रालयांशी सल्ला मसलत करून श्रम आणि रोजगार मंत्रालयाने काही अटींवर महिलांना काम करायची परवानगी दिली.