डोंबिवली मधील कंपनीतून लाखोंचा मुद्देमाल लंपास
डोंबिवली दि.१० – भिवंडी कामतघर येथे राहणारे सर्जेराव गावडे हे डोंबिवली पूर्वेकडील सोनारपाडा सुरत अहमदाबाद ट्रान्सपोर्ट येथे कामाला आहेत. शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गावडे नेहमीप्रमाणे कंपनीला कुलूप लावून घरी निघून गेले. ही संधी साधत अज्ञात चोरट्याने कंपनीच्या गेटचे कुलूप तोडून कंपनीत घुसून दोन कपड्याचे गठाण ,डी व्ही आर मशीन असा मिळून एकूण ८ लाख ९३ हजार १२८ हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. सकाळी ही बाब निदर्शनास आल्यानंतर गावडे यांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली.
हेही वाचा :- डोंबिवली पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्यासह दोघा लाचखोरांना अटक
Please follow and like us: