कोरोना वायरस संसर्गजन्य रोग विषाणूच्या आजारावर मनपाची जनजागृती…
{नारायण सुरोशी}
कल्याण दि.०६ :- सद्या जगात कोरोना वायरस संसर्गजन्य विषाणू रोगाचा आजाराची नागरिकांत भीती निर्माण झाली आहे.हा रोग जीवघेणा असल्याने सर्वच प्रशासकीय कार्यालय आणि रुग्णालयात काळजी घेतली जात आहे. कल्याण-डोंबिवलीचे मनपा आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज सकाळी ११ वाजता स्थानिक पत्रकारांची तातडीची पत्रकार परिषद घेऊन मीडिया मार्फत नागरिकांत जनजागृती निर्माण करण्यासाठी कोरोना वायरस रोगाला नागरिकांनी घाबरण्याचे काहीच कारण नसल्याची सूचना केली आहे. तसेच कोरोना वायरस आजाराच्या भीतीमुळे बाजारातून महागडे मास्क घेण्याची काहीच आवश्यकता नसल्याचे सांगून,साधा हातरुमाल स्वच्छ धुवून वारण्याचा चांगला सल्ला दिला आहे.
हेही वाचा :- पत्नीवर चाकूने हल्ला जाब विचारण्यास गेलेल्या पतीवरही वार
मनपा आयुक्त डॉ.विजय सिर्यवंशी यांनी सार्वजनिक सभेवर परवानगी नाकारली असून,कोणत्याही राजकीय अथवा सार्वजनिक कार्यक्रमाला सद्या तरी गर्दीच्या ठिकाणी उपस्थित न राहण्याची सर्वच नागरिकांत जनजागृती केली आहे. मनपाच्या क्षेत्रात राहणाऱ्या कोणत्याही नागरिकांना जात सर्दी -खोकल्याने ताप येत असेल तर निष्काळजी करू नका,तात्काळ मनपाच्या कल्याण येथील रुक्मिणीबाई व डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयात विशेष तातडीची इन्सुलेशन पाच बेडची व्यवस्था करण्यात आली असून,आपल्या आरोग्याची मोफत तपासणी करून घेण्यासाठी आवाहन केले आहे.
हेही वाचा :- kalyan ; सुराधारी तरुणावर झडप
मनपा आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांत कोरोना वायरस बाबत जन जागृती करताना नागरिकांना या रोगाला घाबरण्याचे काहीच कारण नसून, सध्या हिवाळ्याचा महिना असल्याने आपल्या आरोग्याची काळजी घ्या …उन्हाळ्यात उष्ण वातावरणात या कोरोना वायरस संसर्जन्य रोगाचे विषाणू आपल्या शरीरात काही इजा करु शकत नाही..परंतु नागरिकांनी सतत जागृत राहण्याचे वारंवार आवाहन केले आहे..