पाथर्डीकरांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिले भरपूर पाणी

आज पालघर जिल्हा संपूर्ण दुष्काळाच्या सावटा खाली असून, शेकडो गावे ओसाड पडली आहेत. पाण्याअभावी लाखो लोकांनी स्थलांतर केलेले आहे. जनतेचे जीवनच उद्ध्वस्त करणारी भयाण परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासन नावाच्या विक्राळ व्यवस्थेने झोपेचे सोंग घेतले आहे, असा आरोप कुंदन संखे यांनी करून, दुष्काळ निवारण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. परंतु प्रभावी अंमलबजावणी बरोबरच सेवेची दूरदृष्टी हे सरकार हरवून बसले असल्यामुळे संखे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यामुळे ढिम्म शासनच्या विरोधात केवळ आंदोलनाची भूमिका न घेता, दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी कुंदन संखे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून जव्हारमधील दुर्गम भागातील आणि मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या पाथर्डी गावात पाण्याच्या चार टाक्या बसवून दिल्या.

जेणेकरून सर्वसामान्य जनतेची पाण्यासाठी होणारी पायपीट आणि जीवघेणी धडपड कमी होईल. आणखी ३ ते ४ गावात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यावेळी उपजिल्हाध्यक्ष भावेश चुरी, तालुका अध्यक्ष गोपाळ वझरे, उपतालुका अध्यक्ष सोमनाथ पिठोले, पालघर तालुका सचिव दिनेश गवई, शहर अध्यक्ष सुनिल राऊत, शहर सचिव शैलेश हरमळकर, निलेश घोलप, मनविसेचे पालघर विधानसभा सचिव जालीम तडवी, शिवा यादव, बाळू दापट, विलास सापटे, अतुल खरपडे, संदीप जाधव, देवा टोकरे, परशुराम वझरे, कैलास नवले, संतोष वझरे, किसन भोये, प्रमिला वझरे, शबी वझरे, जाई खरपडे, सुनीता पिठोले, सपना भुजड, तसेच मनसे सैनिक, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email