इफ्फी 2018 च्या सांगता समारंभात ‘इफ्फी’ विशेष पुरस्काराने गौरवण्यात येणार
गोव्यात सुरु असलेल्या 49 व्या इफ्फीच्या सांगता समारंभात प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान यांना इफ्फी विशेष पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. चित्रपट क्षेत्रातल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात येणार असून 10 लाख रुपये, प्रशस्तीपत्रक आणि शाल या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात येणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) राज्यवर्धन राठोड यांनी आज ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.
हेही वाचा :- नव्या प्रत्यक्ष कर कायद्याच्या मसुद्यासाठी कृती दलाची स्थापना
24 नोव्हेंबर 1935 मध्ये इंदूर येथे सलीम खान यांचा जन्म झाला. अमाप लोकप्रिय झालेला ‘शोले’ हा चित्रपट, ‘दिवार’, ‘जंजीर’ यासारख्या लोकप्रिय चित्रपटांच्या त्यांनी लिहिलेल्या पटकथा रसिकांच्या पसंतीला उतरल्या. अभिनेता आणि निर्माते म्हणूनही त्यांचे योगदान राहिले आहे.