मनोहर भोईर यांच्या प्रयत्नांना यश प्रकल्पग्रस्त गावांना मिळाला न्याय…

(विठ्ठल ममताबादे)

उरण दि.२७ – आमदार मनोहरशेठ भोईर यांनी सन २०१५ पासून विनंती अर्ज समिती समोर नवीन शेव्याच्या प्रत्येक कुटुंबाला दिड गुंठे विकसित जागा तसेच हनुमान कोळीवाडा गावाचे पुनर्वसन करण्यासाठी सतत पाठपुरावा करून  मेहनत घेऊन, महाराष्ट्र शासनास व जे.एन.पी.टी. प्रशासनास जमीन देण्यास भाग पाडले. त्याची पूर्तता मंगळवार दिनांक २५/०६/२०१९ रोजीच्या विनंती अर्ज समिती समोर करण्यात आली. उर्वरित जमीन दोन्ही गावांना मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा जलद गतीने केला सुरु केला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हा केंद्र शासनाचा महत्वाकांशी प्रकल्प असून सदर प्रकल्पासाठी शासनाने प्रकल्पग्रस्त मुल गावांची २५८४ हेक्टर आर इतकी जमीन संपादित केली आहे. संपादनामुळे शेवा गावचे पुनर्वसन करण्यासाठी गावठाणाकरिता ३३-६४-५ हे आर. एवढे क्षेत्र उपलब्ध करून देवून त्यांचे पुनर्वसन १०-०० हे.आर. मध्ये मौजे बोकडविरा येथील गावठाणात करण्यात आले आहे. उरलेल्या जमिनीपैकी वाढीव गावठाणा करिता नवीन शेवा गावाला ५.२७.० हे.आर. एवढी जमीन सेक्टर ४८ मध्ये विनंती अर्ज समिती अध्यक्ष मा.विजय औटी यांनी नगर विकास प्रधान सचिवांना आदेश दिले आहेत. तसेच हनुमान कोळीवाडा या गावाचे पुनर्वसन  मौजे बोरीपाखाडी येथे १७ हे.आर. मध्ये करण्यात आले असून पुनर्वसन केलेल्या जागी वाळवी लागल्यामुळे तेथील नागरिक घरे पडण्याच्या भीती खाली गेली.

कित्येक वर्ष जगत आहेत. यासाठी आमदार मनोहरशेठ भोईर  यांनी सन २०१५ पासून विधानसभेच्या विनंती अर्ज समितीकडे पाठपुरावा करून वारंवार बैठका घेऊन शासनाच्या निदर्शनास आणून दिले कि यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. त्यानुसार दि.२५.६.२०१९ रोजी विधानसभा उपाध्यक्ष्यांच्या दालनात विनंती अर्ज समितीची बैठक घेऊन हनुमान कोळीवाडा या गावाचे पुनर्वसन करण्याकरिता फुंडे गावाजवळ जुने शेवे गाव रोड येथे ६.२२.७७ हे.आर एवढी जागा देण्याचा प्रस्ताव जेएनपीटी कडून देण्यात आला. त्यास विनंती अर्ज समिती अध्यक्ष मा.विजय औटी यांनी मान्यता देवून लवकरात लवकर गावाचे पुनर्वसन करण्याचे आदेश संबधितांना दिले आहेत. तसेच दोन्ही गावाची उर्वरित जमीन प्रकल्पग्रस्त गावांना देण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्याचेहि आदेश शासनाच्या प्रतिनिधीना दिले. या बैठकीस आमदार मनोहरशेठ भोईर ,नवीन शेवा गावचे अध्यक्ष कमलाकर पाटील, भाजप चिटणीस चंद्रकांत घरत, कॉंग्रेस उपाध्यक्ष पंडित घरत, पंचायत  समिती सदस्य हिराजी घरत, शाखाप्रमुख शैलेश भोईर, तंटामुक्त अध्यक्ष हेमंत म्हात्रे, हनुमान कोळीवाडा सरपंच परमानंद कोळी, नवीन शेवा गावचे अध्यक्ष सुरेश कोळी तसेच जे.एन.पी.टी. चेअरमन संजय शेट्टी, सिडको व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, नगरविकास प्रधान सचिव नितीन करीर  व दोन्ही प्रकल्पग्रस्त गावांचे प्रतिनिधी व शासनाचे अधिकारी उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email