डोंबिवलीत विचित्र घरफोडी देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास

डोंबिवली दि.११ :- कल्याण-डोंबिवलीमध्ये घरफोडीच्या घटना वाढल्या असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बंद घरांचे दरवाजाचे लॉक तोडून चोरी करणाऱ्या चोरटे आता नागरिक साखरझोपेत असताना घरात घुसून चोरी करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. वृद्ध महिला घरात झोपले असताना चोरट्यानी घराचे लॉक तोडून देघरातील देवीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना डोंबिवली मिलापनगर परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. डोंबिवली पूर्वेकडील मिलापनगरमधील उस्मा पेट्रोल पंप समोरील दुर्गा बंगल्यामध्ये वनिता बाळकृष्ण कोरगावकर (७८) ही महिला एकटीच राहते. शुक्रवारी भल्या पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या बंगल्यामध्ये चोरट्याने मुख्य व सेफ्टी दरवाजाचे लॅच तोडून प्रवेश केला व आतील कपाटातील किंमती सामानाचा शोध घेतला.

हेही वाचा :- रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारडे येथे रात्रीची शाळा नाविन्यपूर्ण उपक्रम

मात्र काहीच हाती लागले नसल्याने अखेर देवघरातील देवीला घातलेले मंगळसूत्र चोरून चोरटे पसार झाले. बेडरूममध्ये झोपलेल्या वनिता यांना चाहूल लागली. बेडरूमचा दरवाजा न उघडता त्यांनी शेजारी राहणाऱ्यांना फोन करून कळविले. नागरिक घरात येण्याआधीच चोरट्यांनी तेथून पळ काढला होता. कोरगावकर या एकट्याच घरात एकट्याच राहतात. त्यांची दोन्ही मुले अमेरिकेत स्थायिक झाली आहेत. यापूर्वीही त्या घरात नसताना अनेक वेळा घरफोडीचा घटना झाल्या होत्या. मात्र शुक्रवारच्या या घटनेमुळे त्या घाबरल्या आहेत. शेजारच्यांना समजताच त्यांनी घराकडे धाव घेऊन मानपाडा पोलिसांना कळविले असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याबाबत मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत चोरट्याचा शोध सुरू केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email