कर्करोगावरचे उपचार माफक दरात उपलब्ध करुन द्यावेत- उपराष्ट्रपती
नवी दिल्ली, दि.२९ – कर्करोगावरचे उपचार माफक दरात उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. कर्करोगावरचे उपचार दिवसेंदिवस खर्चिक होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. ते आज बेंगलुरु येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणाला पायबंद घालण्यासाठी प्रतिबंधात्मक, उपचारात्मक कार्यक्रम राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावरही मजबूत करायला हवेत असे उपराष्ट्रपती म्हणाले.
चांगले उपचार देऊ करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ आणि उपचाराकरिता मोठ्या गुंतवणुकीची गरज आहे. मात्र, कर्करोग उपचार माफक दरात उपलब्ध व्हावेत यासाठी सरकारने विविध धोरणात्मक पर्यायांचा शोध घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
Please follow and like us: