महाराष्ट्र स्टेट को-ऑप. हाऊसिंग फेडरेशनच्या पुढाकाराने 31 मे ते 2 जून या कालावधीत ठाण्यात परिसंवाद व प्रदर्शन

((म विजय)

ठाणे, दि. 27 – सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कामकाजात सुलभता यावी म्हणून महाराष्ट्र स्टेट को-ऑप. हौसिंग फेडरेशन लि.च्या वतीने परिसंवाद व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट को-ऑप. हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

31 मे ते 2 जून 2019 या कालावधीत शिवाजी मैदान, तलावपाळी, जांभळी नाका येथे प्रदर्शन आणि परिसंवाद 1 जून रोजी गडकरी रंगायतन, ठाणे येथे सकाळी 10 ते 1.30 या वेळेत संपन्न होईल. प्रदर्शनामध्ये गृहनिर्माण संस्थांसाठी लागणाऱया सर्व विषयांची माहिती मिळण्यासाठी विविध विषयांच्या तांत्रिक बाबींचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. यात घनकचऱयाचे नियोजन, पार्किंगविषयी, बायोगॅस, इलेक्ट्रीकल कॉन्ट्रक्टर, ई-वेस्ट मॅनेजमेंट, इमारत दुरुस्तीविषयक माहिती, हाऊस किपींग, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता, सोसायटी सॉफ्टवेअर, स्वयंपुनर्विकास, ऑडीटर्स, फायर ऍण्ड सेफ्टी, वॉटर प्रुफींग, वॉटर स्टोरेज टँक, सोलर व्यवस्था आदी विषयांचे स्टॉल्स प्रदर्शनात उपलब्ध असणार आहेत.

त्याचप्रमाणे गृहनिर्माण संस्थांसाठी गृहनिर्माण संस्थांचा स्वयं पुनर्विकास, सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज व येणाऱया अडचणी, त्याचप्रमाणे नुकतेच मंजूर झालेले गृहनिर्माण संस्थांविषयीचे नवीन चॅप्टर, स्ट्रक्चरल ऑडिट या विषयांवर अपामे वास्तूविशारद चंद्रशेखर प्रभू, सहकार आयुक्त सतीश सोनी, हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे व संजय कोयंडे आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

पावार, 31 मे रोजी सायंकाळी 4 वाजता शिवाजी मैदान, तलावपाळी, ठाणे येथे महाराष्ट्र स्टेट को-ऑप. हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. यावेळी पुणे डिस्ट्रीक्ट को-ऑप. हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, मुंबई डिस्ट्रीक्ट को-ऑप. हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र स्टेट को-ऑप. हाऊसिंग फेडरेशन लि., सहकारी गृहनिर्माण संस्थांची राज्यस्तरीय संघीय संस्था आहे. महाराष्ट्रात जवळपास अडीच लाख सहकारी संस्था आहेत. त्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांची संख्या जवळपास एक लाख पांच हजारच्या आसपास आहे. या सगळ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधित्व राजस्तरावरची संघीय संस्था म्हणून महाराष्ट्र स्टेट को-ऑप. हाऊसिंग फेडरेशन लि. ही संस्था करते, अशी माहिती सिताराम राणे यांनी यावेळी दिली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email