१० वी १२ वी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर
मुंबई दि.११ :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या फेब्रुवारी मार्चमध्ये होणाऱ्या १० वी १२ वी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर. दहावी आणि बारावी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहवी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार दहावीची लेखी परीक्षा ३ मार्च २०२० ते २३ मार्च २०२० या दरम्यान होणार आहे.
हेही वाचा :- 20 नोव्हेंबर रोजी लॉन्च होणार बजट स्मार्टफोन रिअलमी 5s; 48MP क्वाड रिअर कॅमरेा सेटअप मिळणार
तर बारावीची लेखी परीक्षा १८ फेब्रुवारी २०२० ते १८ मार्च २०२० या कालावधीत होणार आहे. तसेच लेखी परीक्षेसोबत प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी आणि इतर विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक मागाहून स्वतंत्रपणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने कळविण्यात येणार आहे. शिक्षण मंडळाचे हे अंतिम वेळापत्रक हे पुणे, नागपूर, औरंगाबद, मुंबई, कोकण, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर या नऊ विभागीय मंडळांमाफेत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांसाठीचे आहे.
Hits: 1