फाईल हरवली की चोरी झाली?, महापालिकेत आयुक्त कार्यालया सह सर्वच विभागात फाईलची शोधाशोध

( बालकृष्ण मोरे )

कल्याण दि.०६ – कल्याण डोंबिवली महापालिकेतील एक फाईल गहाळ असून या फाईलची शोधाशोध सुरू झाली आहे. ही फाइल शोधण्या साठी थेट आयुक्त कार्यालय, शहर अभियंता या बरोबरच सर्व खाते प्रमुखना परिपत्रकच काढण्यात आले आहे.उल्हासनगर महापालिकेत एक भाजपाचा नगरसेवकच फाइल चोरताना आढळून आला होता. अशी फाइल चोरीचा घटना तर कल्याण डोंबिवली महापालिकेत घडली तर नाही ना अशी या बाबत चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा :- बारवी धरणाचे सर्व दरवाजे उघडले

महापालिकेच्या चिकणघर येथील आरक्षण क्र.२१६ भूखंडावर खेळाडू वस्तीगृह , ‘व्यायाम शाळे सह प्रेक्षक गँलरी बांधनेचे उर्वरित काम’ या कामाचे प्राकलन रक्कम १ कोटी ३८ लाख ८२ हजार ९३६ या कामाची ही फाइल होती. ही फाईलच गहाळ झाली की चोरी झाली या बाबत शोधाशोध चालू झाली आहे. सदर कामाची निविदा सूचना क्रमांक ८८/ २०१८/ १९ या निवेदेची (तिसरी सुचना) प्रसिद्ध करण्यात आली होती. या कामाचा मूळ प्रस्ताव प्राकलन नस्ती आणि निविदा नस्ती १५ फेब्रुवारी १९ पासून गहाळ झाल्याचे या परिपत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा :- ‘कलम 370 रद्द’वर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

या बाबत आयुक्त कार्यालय, शहर अभियंता कार्यालय तसेच सर्वच विभागाचे खाते प्रमुख यांना या परिपत्रका बाबत कळविण्यात आले असून सदरची फाइल मिळाल्यास लेखा अभियांत्रिकी कार्यालया कडे तातडीने पाठविण्यात यावी जेणे करून प्रकरणातील पुढील कारवाई करणे सोईचे होईल. या परिपत्रकावर वर कार्यकारी अभियंता (प्रकल्प) तरुण जुनेजा यांची सही आहे.या मुळे आता ही फाइल चोरीला गेली की खरच गहाळ झाली या बाबत महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

तमतमाए amit shah ने loksabha में कहा – PoK के लिए जान दे देंगे
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email