लोकनेते पँथर संजय गायकवाड यांची आर. पी. आय. उरण तालुका अध्यक्ष पदावर निवड

उरण दि.२६ – संजय गायकवाड हे पूर्वीचे पँथरचे कार्यकर्ते तसेच त्यांचे सामाजिक काम पाहता, कामगार व सर्व थरातील श्रमिक वर्गात कामाचे संघटन कौशल्य पाहून, मा. रामदास आठवले केंद्रीय समाज कल्याण मंत्री, रिपाई चे राष्ट्रीय अध्यक्ष यांचा आदेशानुसार भाई जगदीश गायकवाड रायगड जिल्हा तथा कोकण प्रदेश अध्यक्ष यांचा शुभहस्ते संजय जनार्दन गायकवाड यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) उरण तालुका अध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली आहे.

त्यांच्या निवडीने उरण तालुक्यातीळ सर्व थरातील लोकांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून माजी आमदार सुमंतराव गायकवाड, मा. अविनाशजी महातेकर राष्ट्रीय सरचिटणीस, मा. दयानंद बहादूरे राष्ट्रीय सरचिटणीस, मा. सिद्राम ओव्हाळ नवी मुंबई अध्यक्ष, मा. गौतम सोनावणे मुंबई प्रदेश अध्यक्ष यांनी तसेच त्यांच्या चाहत्यांनी संजय गायकवाड यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email