Live news ; अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव आला तर बोलणी सुरू होतील – संजय राऊत

संजय राऊतांचे ठळक मुदे

अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव आला तर बोलणी सुरू होतील. ‘ठरल्या प्रमाणे करा’ असा आमचा एका ओळीचा प्रस्ताव आहे. आमच्याकडे पर्याय आहे, त्याशिवाय आम्ही बोलत नाही. संख्याबळ झालेलं आहे, ते आम्ही सभागृहात दाखवू शिवसेना आशेवर नाही तर आत्मविश्वासावर जगते. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणारच सत्तेची हवस सोडून द्या आणि सांगा की आम्ही सत्ता स्थापू शकत नाही. सगळ्यात मोठा पक्ष असूनही भाजप सत्ता स्थापन करत नाही याचा अर्थ हा होतो की ते संख्याबळ जमवू शकलेले नाही. शिवसैनिक असेल असं म्हणत असाल तर शिवसैनिकाप्रमाणे दिलेला शब्द पाळा, शिवसैनिक नेहेमी सत्याच्या मार्गावर चालतो, तो चुकीच्या मार्गावर चालत नाही.

हेही वाचा :- सहा हजार एकरवरील द्राक्षांना फटका

शिवसैनिक असेल असं म्हणत असाल तर शिवसैनिकाप्रमाणे दिलेला शब्द पाळा, शिवसैनिक नेहेमी सत्याच्या मार्गावर चालतो, तो चुकीच्या मार्गावर चालत नाही. देवेंद्र फडणवीस हे शिवसैनिकच आहेत असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते, त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की ‘उपमा, अलंकार वापरून राजकारण होत नाही’ साम,दाम.दंड,भेद हा व्यक्तीचा नाही तर सत्तेचा असतो. आता कोणतेही घटनाविरोधी कृत्य, दबाव, धमक्या चालणार नाही. 2014 सालची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात फरक आहे. त्यांनी सांगितले की जनादेश महायुतीला मिळाला आहे, असं असेल तर मग सत्तास्थापनेचा ते दावा का सादर करत नाही ? राजभवनाबाहेर चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांची पत्रकार परिषद ऐकली.

हेही वाचा :- दुसऱ्यादिवशीही महापालिकेची धडक कारवाई फुटपाथवरील बांधकामे जमीनदोस्त

24 तारखेला निकाल लागल्यावर उद्धव ठाकरेंनी हेच सांगितले, विधीमंडळ पक्षनेता निवडीमध्ये देखील हेच सांगितले की युती तुटेल असे मी काहीच करणार नाही. अस्थिरता ज्यांच्यामुळे निर्माण होते आहे ते महाराष्ट्राचे नुकसान करीत आहे. जो निर्णय उद्धव ठाकरे घेतील तो आम्हाला मान्य असेल असे आमदारांनी सांगितले. शिवसेनेच्या सगळ्या आमदारांनी एकमुखाने उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा दिला. भाजप त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत का हा त्यांना प्रश्न विचारा. शिवसेना आणि उद्धव ठाकरे नेहेमी भूमिकेवर छाम राहिलेले आहे. शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email