रॉकेट आणि उपग्रहाचे प्रक्षेपण
नवी दिल्ली, दि.२७ – गेल्या पाच वर्षात भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोने 26 प्रक्षेपक मोहिमांसह 28 भारतीय उपग्रह तंत्रज्ञानविषयक 7 डेमॉनस्ट्रेटर्स, भारतीय विद्यापीठे/संस्थांनीं विकसित केलेले 5 विद्यार्थी उपग्रह आणि 202 परदेशी उपग्रह प्रक्षेपित केले.
अवकाश आणि अणुऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंग यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
Please follow and like us: