Latest News ; शिवसेनेशिवाय भाजप राज्य करू शकत नाही: संजय राऊत

मुंबई दि.२३ :- ‘विधानसभेच्या नव्या सभागृहात शिवसेनेचे १०० हून अधिक आमदार निवडून जातील,’ असा विश्वास व्यक्त करतानाच, राज्यात भाजपाला शिवसेनेशिवाय पर्याय नसून, शिवसेनेशिवाय ते राज्य करु शकत नाहीत असा दावा शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज केला. महायुती २०० च्या वर जाणार हे सांगायला कोणत्याही पोल किंवा ज्योतिषाची गरज नाही असा टोला यावेळी त्यांनी लगावला. २०१४ च्या निवडणुकीत त्यांना शंभरहून अधिक जागा मिळाल्या होत्या. त्यापेक्षा जास्त मिळाव्या असा त्यांचा प्रयत्न असणं साहजिक आहे.

हेही वाचा :- Letest News मोदी सरकार शेतकऱ्यांना देणार ‘दिवाळी गिफ्ट’? आज होणार निर्णय

शेवटी सत्ताधाऱ्यांकडं जी काही साधनं असतात त्याचा फायदा मिळतोच, असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं. ‘शिवसेनेला १२४ जागाही मिळू शकतात. पण शेवटी आम्ही युतीमध्ये लढलो आहे. भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांना एकमेकांशिवाय पर्याय नाही,’ असंही ते म्हणाले. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणारच, याचा पुनरुच्चारही संजय राऊत यांनी केला. महाराष्ट्रात कमी मतदान होणं चितेचं वातावरण आहे. जास्तीत जास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजावायला हवं होतं.

हेही वाचा :- Latest News ; राज्याभरातील परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान…

लोक कमी का मतदान करत आहेत याचं चिंतन करणं गरजेचं असल्याचं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार का असं विचारला असता त्यांनी सांगितलं की, “महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवणार हा उद्धव ठाकरेंचा शब्द आहे. शिवसेनेचे सर्व नेते यासाठी शेवटपर्यंत प्रयत्नशील राहतील. शिवसेनेचा मुख्यमंत्री असावा अशी आमचीही इच्छा आहे. आमचा उद्धव ठाकरेंच्या शब्द, डावपेच, आत्मविश्वास यावर खूप विश्वास आहे”.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email