डोंबिवलीत रंगणार काराओके संगीत स्पर्धा…

कल्याण दि.३० :- आजच्या ऑनलाईनच्या युगात सर्व सांस्कृतिक कार्यक्रम झटपट आणि सोप्या पद्धतीने अनेक संस्थेच्या वतीने सामाजिक सेवेतून समाजाला जागृत करण्यासाठी केले जात आहेत. अशाच एका संस्थेच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून इतरांना संगीताचे ज्ञान व प्रोत्साहन मिळावे म्हणून विशेष सहायता केली जात आहे. डोंबिवली पूर्व येथील श्रीराज संगीत विद्यालयाने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त “चांद सितारे काराओके” संगीत स्पर्धा येत्या ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३:३० वा. आयोजित केली आहे.

हेही वाचा :- ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे दु:खत निधन

हा उपक्रम वरद सभागृह श्री गणेश मंदिर संस्थान येथे होणार आहे असे संस्थेच्या मृणाल कानडे यांनी माहिती दिली आहे. श्रीराज संगीत विद्यालयाच्या वतीने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमातून मुला-मुलींना प्रेरणा देण्यासाठी स्पर्धा भरविण्यात येत आहेत. याच संगीत विद्यालया तर्फे पितृ पक्षाच्या निमित्ताने १४ -१५ सप्टेंबर रोजी अभंग गायन सामुहिक व वैयक्तिक स्पर्धा- उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा :- “संगीत क्षेत्रातील चंद्रमा लता” पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रकाशन

त्यास सर्वांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.वारकरी देखील उपस्थित होते..सर्वांचा आनंद वाढला. स्वामीसमर्थ भक्त सौ.माधुरी नित्यानंद घाटे जी, श्रीरामदासस्वामी भक्त अमेय गुणे जी, ह.भ.प.श्री.माधव गुणे रामदासी बुवा जी हे सन्माननिय परिक्षक लाभले. येत्या ६ ऑक्टोबर ला स्पर्धा आणि १९ ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मराठी हिंदी गाणी काराओके ट्रॅकवर अशी संगीत रजनी होणार आहे.अवश्य लाभ घ्यावा.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email