kalyan ; धावत्या लोकलवर दगडफेक प्रवासी जखमी

डोंबिवली दि.२८ :- गेल्या काही महिन्यांमध्ये मध्य रेल्वेच्या मार्गावर रेल्वेवर काही समाजकंटक दगड भिरकावीत असल्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. भिरकावलेला दगड लागल्याने अनेक प्रवासी जखमी होण्याच्या घटना घडल्या असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशीच एक घटना कल्याणनजीक ठाकुर्ली ते पत्री पूल यादरम्यान घडली.

हेही वाचा :- डोंबिवली विधानसभेचा उमेदवार सुशिक्षित आणि स्वच्छ प्रतिमेचा हवा- आप नेते दीपक दुबे

आंबिवली येथे राहणारा ओमकार पाठारे हा तरुण ठाणे येथील एका बँकेत नोकरी करतो. काल सायंकाळी ओमकार नेहमीप्रमाणे ठाण्याहून फास्ट लोकल पकडून घरी परतण्यासाठी निघाला. साडेआठ वाजण्याच्या सुमारास ठाकुर्ली ते पत्री पूल यादरम्यान ट्रेन पोहचली असताना अचानक अज्ञात इसमाने बाहेरून ट्रेनवर दगड भिरकावला.

हेही वाचा :- दीदींच्या स्वरांकीत भावमुद्रांच्या खास पुस्तकाचे केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या हस्ते प्रकाशन

हा दगड ओमकार यांच्या हाताला लागल्याने त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला उपचारांसाठी कल्याण रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी डोंबिवली पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

सडको पर आवारा जानवरों की हिंसक करतूत

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email