Kalyan ; भर वर्दळीतून रिक्षा गायब
डोंबिवली दि.०२ :- कल्याण-शिळ रोडला असलेल्या सोनारपाडा गावातील वामन म्हात्रे चाळीत राहणारे रामचंद कांबळे यांनी त्यांची रिक्षा बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील स्कायवॉक खाली उभी करून ते जवळच असलेल्या पोळी-भाजी केंद्रावर पोळी-भाजी आणण्यासाठी गेले.
हेही वाचा :- कल्याणच्या वालधुनीत महिन्याभरापासून विजेचा लपंडाव विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम
ही संधी साधत अज्ञात चोरट्याने भर वर्दळीतून त्यांची रिक्षा चोरून नेली. काही वेळाने रिक्षा जवळ परतल्यानंतर म्हात्रे यांना रिक्षा चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यांनी या प्रकरणी डोंबिवली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
Please follow and like us: