कल्याण ; हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण
कल्याण दि.१२ – कल्याण पश्चिम बेतूरकरपाडा गजानन महाराज नगर येथे राहणारे आगर ढोले यांचे बिर्ला कोलेज रोड वर कॅफे लिक्विड लव नावाने हॉटेल आहे सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी इसम हॉटेल मध्ये आला. त्याने पिज्जाची ऑर्डर दिली. पिजा तयार होईपर्यत हॉटेलमध्ये बसून राहिला. पिज्जा तयार झाल्यानंतर हॉटेल मॅनेजर रणजीत गौतम याने पिज्जा देण्यासाठी त्याच्याजवळ गेला.
हेही वाचा :- कल्याण ; दुकानातून सुमारे सोळा लाखांचे लेपटोप लंपास
यावेळी सदर अनोळखी इसमाने पिज्जा घेण्यास नकार देऊन हॉटेलच्या बाहेर निघून गेला. त्यामुळे मॅनेजरने ऑर्डर देवून पिज्जा का घेत नाही असे विचारले. त्यामळे संतापलेल्या अनोळखी इसमाने रणजीत यांना बेदम मारहाण केली. त्यामळे हॉटेलमालक ढोले त्या ठिकाणी गेले असता या अनोळखी इसमासह त्याच्या दोन साथीदाराने लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण केली. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.