पंतप्रधान दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण येथील डम्पिंगवर विशेष लक्ष २४ तास सुरक्षारक्षकासह केमिकल फवारणी

डोंबिवली दि.१६ – महाविपालिका प्रशास्नाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिम आधारवाडी डम्पिंग वर आपल लक्ष केंद्रित करत केविलवाणा आटापिटा चालवला आहे. या डम्पिंग प्रश्नी पुन्हा नाचक्की नको म्हणून पालिका प्रशासनाने याठिकाणी 24 तास सुरक्षारक्षक तैनात करण्यासह वास येऊ नये म्हणून केमिकल फवारणी सुरू केली आहे. डम्पिंगबाबत महापालिकेने केलेल्या या उपाययोजनांचे स्वागत केले असले तरी याआधी ते का केले नाहीत असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच पंतप्रधान येणार म्हणून या उपाय योजना न राबवता कायमस्वरूपी त्याची अंमलबजावणी करण्याची मागणीही स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

हेही वाचा :- पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त कॉंग्रेसच्या वतीने डोंबिवलीत चित्रकला स्पर्धा

गेल्या काही वर्षांत कल्याण डोंबिवलीतील कचऱ्याचा प्रश्न अत्यंत जटिल बनला आहे. कल्याण डोंबिवली महापालिका व लोकप्रतिनिधी कडून प्रयत्न सुरू असल्याचा दावा करण्यात येत असला. तरी प्रत्यक्षात कागदोपत्री प्रयत्न सुरू असून अद्याप प्रकलप पूर्ण नाहीत. काही दिवसांपूर्वीच फडके मैदानात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. त्यावेळी डम्पिंगवरील कचऱ्याला आग लागण्याची घटना घडली होती त्यामुळे पालिका प्रशासनाची नाचक्की झाली होती. येत्या 18 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याणात येत आहेत. निदान त्यांच्यासमोर तरी महापालिकेची नाचक्की होऊ नये.

हेही वाचा :- उद्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले कल्याणात

यासाठी महापालिकेने आटापिटा चालवला असून डम्पिंगवरील कचऱ्याला आग लागण्याची घटना घडली होती. प्रकार पंतप्रधानांसमोर घडू नये यासाठी महापालिकेने डम्पिंगवर 24 तास 30 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. डम्पिंग ग्राऊंडच्या यासाठी एका खासगी कंपनीला कंत्राट देण्यात आले असून कचऱ्याची दुर्गंधी येऊ नये म्हणून डम्पिंगवर सतत केमिकल फवारणीही सुरू आहे. तर आग लागल्यास खबरदारीचा उपाय म्हणून शेजारील असणाऱ्या एसटीपी प्रकल्पातून पाण्याची मोठी लाईनही वरपर्यंत नेण्यात आले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email