कल्याण ; महापालिका सफाई कामगारांना शिवीगाळ

कल्याण दि.२० – महापालिका सफाई कामगारांना कचरा उचलण्यास विरोध करत शिवीगाळ करत दमदाटी केल्याची घटना कल्याण पूर्वेत घडली आहे. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस स्थानकात रवींद्र पांडे, धर्मेंद्र सिंग, कृष्णकुमार शुक्ला व इतर ३ ते ४ रहिवांशाविरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे. कल्याण पूर्व पुना-लिंक रोड ममता हॉस्पिटल गणेश लहर इमारती मध्ये रविवारी कचरा उचलण्यास गेलेल्या महापालिकेच्या कंत्राटी कामगार संजय गायकवाड, विक्रम भोईर, नरेश कदम यांना सोसायटी मध्ये रहाणारे रवींद्र पांडे, धर्मेंद्र सिंग, कृष्कुमार शुक्ला व इतर ३ ते ४ रहिवाश्यांनी कचरा उचलू न देता. त्यांना शिवीगाळ केली.

हेही वाचा :- डोंबिवलीत भरदिवसा घरफोडी

यावेळी पालीकेचे अधिकारी उदय निकुंभ त्याठिकाणी समजूत काढण्यास गेले असत त्यांनी निकुंभ यांना देखील शिवीगाळ करत धमकी दिली. या प्रकरणी निकुंभ यांनी पालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ दमदाटी करत कचरा उचलण्यास मज्जाव करत कचरा उचलला न गेल्याने परिसारत दुर्गंधी पसरून नागरिकाच्या आरोग्यास धोका निर्माण केल्याबाबत कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दखल केली आहे तक्रारी नुसार पोलिसांनी रवींद्र पांडे ,धर्मेंद्र सिंग ,कृष्कुमार शुक्ला व इतर ३ ते ४ रहिवाशविरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email