Kalyan ; घरासमोरील बांबू काढण्यास रोखल्याने बेदम मारहाण

Hits: 0

डोंबिवली दि.०५ :- कल्याण पश्चिम मोहने विकास कॉलनी जवळ एमडी चाळीत राहणारे सोपान भगत काल सकाळी घरात होते यावेळी साडे सात वाजण्याच्या सुमारास भगत यांच्या शेजारी राहणारे दुर्गेश भंडारी, राजा भंडारी व अभिमन्यू हे तिघे भगत यांच्या घरासमोरील बांबू काढत होते. भगत यांनी या तिघांना बांबू काढू नका असे सांगितले.

हेही वाचा :- Dombivali ; बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्जावर मोबाईल घेणारा भामटा बेपत्ता

त्यामुळे संतापलेल्या दुर्गेश भंडारी, राजा भंडारी व अभिमन्यू या तिघांनी भगत यांना शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तर राजा याने त्याच्या तोंडावर कोणत्यातरी टणक वस्तूने हल्ला केला. या मारहाणीत भगत जखमी झाले. या प्रकरणी भगत यांनी खडकपाडा पोलिसांच्या तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार पोलिसांनी दुर्गेश भंडारी, राजा भंडारी व अभिमन्यू या तिघा विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.