Kalyan ; रेल्वे रुळालगत सापडले ३६ लाखांचे मोबाइल
Hits: 1
कल्याण दि.०४ :- कल्याण वालधुनी दरम्यान असलेल्या ठिकाणावर गस्ती घालत असताना महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांना कल्याणकडून वालधुनीच्या दिशेने रुळांमधून चार अज्ञात तरुण चालत येत असताना दिसले. पोलिसांना पाहताच त्यांच्याकडील बॅगा तेथेच फेकून त्यांनी पळ काढला.
हेही वाचा :- आदित्य ठाकरे यांची डोंबिवली ठाकुरलीत प्रॉपरटी
या बॅगांमध्ये ३५ लाख ८५ हजार किमतीचे एकूण १९४ मोबाइल सापडल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान हे सर्व मोबाइल भिवंडीमधील गोदामातून चोरल्याचे निष्पन्न झाले. रेल्वे पोलिस या चोरट्याचा सीसीटीव्हीच्या मदतीने शोध घेत आहेत.