Kalyan ; तोतया पोलिसाने वृद्धाला लुबाडले

डोंबिवली दि.१५ :- कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा वायले नगर मोहन हाइट्स रॉयल बिल्डिंगमध्ये राहणारे 65 वर्षे वृद्ध इसम गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रिक्षाने प्रवास करत होते रिक्षा सहजानंद चौक येथे पोहोचली असता रिक्षा चालकाने त्यांना मागे साध्या वेशातील पोलिस बसलेले असून ते गुटख्याची तपासणी करत आहेत असे सांगितले.

हेही वाचा :- Dombivali ; बनावट दागिने गहाण ठेवत सोनाराला सहा लाख ७० हजारांना गंडा

मागे बसलेला तोतया पोलिसाने त्यांची झडती घेत त्यांच्याकडील 25 हजार रुपये हातचलाखीने लांबवले काही वेळाने वृद्ध इसमास आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले त्यांनी याप्रकरणी महात्मा फुले पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली असून त्यानुसार पोलिसांनी रिक्षाचालक व त्याचा साथीदार तोतया पोलीस या दोघांचा शोध सुरू केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email