Kalyan ; अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे विकृत जिम ट्रेनर गजाआड

{श्रीराम कांदु}

कल्याण दि.२९ :- जिममध्ये अल्पवयीन मुलीसोबत जिम ट्रेनरने अश्लील चाळे करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विकृत जिम ट्रेनरला कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली असून गणेश डांगोर असे त्याचे नाव आहे. कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका परिसरात गणेश जिम आहे. या जिममध्ये गणेश डांगोर हा जिम ट्रेनर म्हणून काम करतो.

हेही वाचा :- कल्याण-डोंबिवलीच्या पुलकोंडीत पडणार भर

या जिममध्ये एक अल्पवयीन मुलीने एडमिशन घेतले होते. मात्र गुरुवारी पहिल्या दिवशीच तिच्या सोबत गैर प्रकार घडला. ट्रेनिंग देताना जिम ट्रेनर गणेश डांगोर याने मुलीसोबत अश्लील चाळे केले. या प्रकरणी सदर पीडित अल्पवयीन मुलीने कोळसरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार अखेर कोळसेवाडी पोलिसांनी जिम ट्रेनर गणेश डांगोर याला अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.