कल्याण – एनएआरसीच्या धोकादायक चिमनीचे सळई कोसळून तरुणी जखमी

डोंबिवली दि.०७ – कल्याण नजीक असलेल्या मोहने यादव नगर रोड वर्षा अपार्टमेंट मध्ये राहणारी प्राजक्ता हि विद्यार्थिनी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास आंबिवली रेल्वे स्थानकालगत असलेल्या एनआरसी कंपनीच्या संरक्षण भितींच्या लागून असलेल्या रस्त्याने पायी जात होती. या ठिकाणी कंपनीच्या धुराच्या चिमणी पाडण्याचे काम सुरु होते हे पाडकाम सुरु असतांना या चीमनीची लोखंडी सळई प्राजक्ता यांच्या अंगावर पडली व त्यांच्या हाताला, डोळ्याला डोक्याला दुख्पात झाली.

हेही वाचा :- डोंबिवली येथे त्रिकुटाने दोघांना लुबाडले

प्राजक्ता हि उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते या या प्रकरणी प्राजक्ता हिच्या वडिलांनी खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी सदर चिमणीचे पाडकाम सुरु असताना सदर कंपनीच्या ठेकेदाराने कोणत्याही प्रकारच्या सुरक्षिततेचे काळजी न घेता हलगरजीपणा केल्याचा ठपका ठेवत ठेकेदार अब्दुल रेहमान अन्सारी विरोधात गुन्हा दाख्ल करत पुढील तपास सुरु केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email