कल्याण ; गॅस गळती प्रकरणी कंपनीच्या माकेनिकासह मॅनेजर वर गुन्हा दाखल
कल्याण – गॅस सिलेंडर रिपेअर करताना हलगर्जीपणा केल्याने गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन चारजण जखमी झाल्या. याप्रकरणी १५ दिवसानंतर गॅस एजन्सीचा मकेनिक आणि मॅनेजरवर खडकपाडा पोलिसांनी हलगर्जीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा :- डोंबिवली ; उघड्या खिडकीवाटे घरात घुसून चेनसह मोबाईल रोकड लंपास….
कल्याण पश्चिमेकडील योगीधाम परिसरातील एका घरात झालेली गॅस गळती दुरुस्त करण्यासाठी आलेल्या कंपनीच्या मकेनिक किसन मोहन राम याने सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेतल्याने दुरुस्ती दरम्यान या गॅसने पेट घेतल्याने घरातील चारजन गंभीररित्या भाजले होते. या प्रकरणी घर मालक मयूर पाटील यांच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिसांनी मकेनिकासह सुरक्षिततेच्या कोणत्याही सूचना न दिल्याचा ठपका ठेवत मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
Please follow and like us: