Kalyan ; शिवीगाळ केल्याचा राग धरून चाकूने भोसकले
Hits: 51
डोंबिवली दि.२५ :- कल्याण पूर्वेतील कचोरे येथील न्यू गोविंदवाडी मधील बीएसयूपी इमारतीत राहणारे हरिश्चंद्र कल्लू सिंग (३२) हे दारू पिवून आपल्या घरात मोठमोठ्याने बोलतात. त्याचा राग आल्याने दीपक सांगळे याने शिवीगाळ केली. तर नितीन सांगळे याने कलिंगड कापण्याचा चाकू त्यांच्या पोटात खुपसून त्यांना जखमी केले. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार टिळक नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा :- नवी मुंबई व औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांची 9 मार्चला प्रसिद्धी