कल्याण-डोंबिवलीत धूम स्टाईल लुटारूंचे थैमान
डोंबिवली दि.२८ – डोंबिवली जवळच्या नांदीवली टेकडीवरील समर्थ बंगला येथे राहणारी महिला शनिवारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पी अँड टी कॉलनी ते स्टार कॉलनी दरम्यान पायी जात होती. इतक्यात अचानक दोन इसम दुचाकीवर आले. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील 1 लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून धूम ठोकली. याच लुटारूंनी काही अंतरावर पायी चालत असलेल्या एका महिलेची 50 हजार रुपये किमतीची सोन्याचे चेन हिसकावून पलायन केले. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
Please follow and like us: