स्वच्छ भारत अभियानाला जपानचे पंतप्रधान शिंजो ॲबे यांचा पाठिंबा
नवी दिल्ली, दि.११ – जपानचे पंतप्रधान शिंजो ॲबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील स्वच्छ भारत अभियानाला आपल्या सरकारचा पाठिंबा दर्शवला आहे. आशियामध्ये आरोग्यपूर्ण समाजाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी जपान कटिबद्ध असल्याचे सांगत त्यांनी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदेच्या यशाबद्दल भारताचे अभिनंदन केले आहे. स्वच्छ पाणी मिळवणे आणि प्रसाधन स्थिती सुधारणे ही जगासमोरील प्रमुख आव्हाने असून या परिषदेतील चर्चेमधून यावर उपाययोजना केल्या जातील अशी आशा त्यांनी एका संदेशाद्वारे व्यक्त केली.
Please follow and like us: