द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठी भारत-कॅनडा चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रतिनिधीमंडळ भारत दौऱ्यावर
नवी दिल्ली, दि.२३ – भारत-कॅनडा चेंबर ऑफ कॉमर्सचे उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळ द्विपक्षीय व्यापार संबंध वाढवण्यासाठी आणि संयुक्त गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा करण्यासाठी 10 दिवसांच्या भारतभेटीवर आले होते. प्रतिनिधीमंडळाने चंदिगढ, चेन्नई, पणजी, हैदराबाद आणि दिल्लीला भेट दिली.
हेही वाचा :- वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या 1000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे सुरेश प्रभू यांच्या हस्ते राष्ट्रार्पण
पायाभूत विकास, माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान, प्रगत निर्मिती, वित्तीय सेवा, पर्यटन, शिक्षण आणि कौशल्य विकास अशा क्षेत्रांवर प्रतिनिधीमंडळाचा भर होता, अशी माहिती भारत-कॅनडा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रमोद गोयल यांनी दिली. तंत्रज्ञान हस्तांतरण आणि व्यापार सुगम करण्याची ग्वाही भारत व्यापार प्रोत्साहन परिषदेने (टीपीसीआय) प्रतिनिधीमंडळाला दिली.
Please follow and like us: