69व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय दालनाचे उद्‌घाटन

बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2019 मध्ये युरोपियन फिल्म मार्केटचे संचालक मॅथिजीस वूटर नोल यांनी भारतीय दालनाचे उद्‌घाटन केले. बर्लिनमधील भारतीय दूतावासाचे मिशन उपप्रमुख परामिता त्रिपाठी आणि इएफएमच्या तांत्रिक आणि विक्री विभागाचे प्रमुख पीटर डमश उपस्थित होते. इफ्फी 2019 च्या पोस्टर्सचे उद्‌घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

हेही वाचा :- ‘संकल्प’चा कला त्रिवेणी विशेषांक

चित्रपट महोत्सव संचालनालयातील अतिरिक्त महासंचालक चैतन्य प्रसाद आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट विभागाचे संचालक जी. सी. आरोन यांच्यासह भारतीय प्रतिनिधी मंडळाच्या सदस्यांनी इएफएमच्या प्रतिनिधीला इफ्फीचे सुवर्ण महोत्सव समारंभाचे महत्व, भारतात चित्रपट निर्मिती सोपी बनवण्यासाठी सरकारच्या धोरणात्मक उपाययोजना, चित्रपट सुविधा कार्यालयाची स्थापना, चित्रीकरणासाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरता www.ffo.gov.in या वेबपोर्टलचा शुभारंभ आणि पायरसी रोखण्यासाठी सिनेमॅटोग्राफी कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणांबाबत माहिती दिली. इफ्फीच्या सुवर्णमहोत्सवी समारंभात सहभागी होण्याबाबत इएफएमशी संबंधित लोक गंभीरतेने विचार करतील, असे नोल यांनी यावेळी सांगितले. इफ्फी समारंभातील सहभागामुळे भारतीय हितधारक आणि चित्रपट उद्योगाला भविष्यात बर्लिनच्या आयोजकांशी परस्पर संबंध मजबूत करण्यात मदत मिळेल.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email