गुन्हेगारीसंबंधित परस्पर कायदेशीर सहकार्यावरील करारावर भारत आणि मोरोक्कोच्या स्वाक्षऱ्या
गुन्हेगारीसंबंधित बाबींमध्ये परस्पर कायदेशीर सहकार्यावरील करारावर भारताच्या वतीने गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू आणि मोरोक्कोच्या वतीने न्यायमंत्री मोहम्मद औजार यांनी आज स्वाक्षऱ्या केल्या.
या करारामुळे मोरोक्कोबरोबर द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत होईल आणि गुन्ह्यांचा प्रतिबंध, तपास तसेच दहशतवादी कृत्यांना आर्थिक मदत पुरवणाऱ्यांचा शोध, प्रतिबंध तसेच संपत्ती जप्त करण्यासाठी व्यापक कायदेशीर चौकट उपलब्ध होईल, असे दोन्ही देशांच्या नेत्यांनी पुर्नआश्वासन दिले.
संघटीत गुन्हे आणि दहशतवादामुळे निर्माण झालेल्या धोक्यांचा संयुक्तपणे सामना करण्याचा पुनरूच्चार दोन्ही नेत्यांनी केला.
Please follow and like us: