विशेष मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात १५ हजार नवीन मतदार नोंदणी अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी दिली विविध मतदान केंद्रांना भेट

ठाणे दि.०६ – आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी शनिवार व रविवार असे दोन दिवस हाती घेण्यात आलेल्या विशेष मोहीमेला चांगला प्रतिसाद मिळाला. या दोन दिवसांत मिळून सुमारे १५ हजार नवीन नोंदणीचे अर्ज स्वीकारण्यात आले अशी माहिती निवडणूक शाखेने दिली. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी काल स्वत: काही मतदान केंद्रांवर भेटी देऊन या मोहिमेची पाहणी केली तसेच चर्चाही केली. विशेष म्हणजे १८ आणि १९ वयोगटातील १३१३६ अर्ज स्वीकारण्यात आले. बेलापूर येथे सर्वाधिक म्हणजे २११२ अर्ज घेण्यात आले. तर मुंब्रा कळवा येथे सर्वात कमी म्हणजे ३८३ अर्ज आले. गेल्या आठवड्यात झालेल्या पहिल्या टप्प्यातील मोहिमेत १० हजार नवीन नाव नोंदणीसाठी अर्ज आले होते. दि. ०१ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तथापि, यामध्ये मतदार नोंदणी झाली नाही अशा वंचित नागरिकांसाठी मतदार नोंदणीची आणखी एक संधी मिळावी या उद्देशाने ही विशेष मोहीम राबविण्यात आली.

हेही वाचा :- डोंबिवली ; पार्किंग प्लाझातील रिक्षा स्टँन्डवरून शिवसेना भाजपमध्ये जुंपली

सर्व अर्ज उपलब्ध

दोन्ही दिवस सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नागरीकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारत होते,शिवाय बीएलओंकडे देखील नमुना क्र. 6, 7, 8 व 8अ चे अर्ज उपलब्ध होते. नागरीकांनी आपले नाव मतदार यादीत तपासण्यासाठी वेबसाईट व १९५० हेल्पलाईनचा देखील उपयोग केला. शनिवार व रविवार असे दोन्ही दिवस जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन मोहिमेची पाहणी केली तसेच भारत निवडणूक आयोगाने सुचना दिल्याप्रमाणे मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा आहेत किंवा नाहीत त्ते तपासले. विशेषतः दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, लिफ्ट, व्हील चेअर आदी विविध सुविधा असल्याची खात्री त्यांनी केली तसेच आवश्यक त्या सुचना दिल्या. त्यांच्यासमवेत तहसीलदार निवडणूक सर्जेराव म्हस्के पाटील हे होते. उप जिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी आरोलकर यांनी देखील जिल्ह्यातील काही मतदान केंद्रांना भेटी दिल्या.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email