पालिका शाळेतही शिक्षणाचा दर्जां उत्तम १० वीच्या परीक्षेत ९२ टक्के मिळून पालिकेच्या शाळेतून कोमल यादव पहिली
डोंबिवली दि.१५ – खाजगी शाळा आणि पालिकेच्या शाळेतील शिक्षण यात काहीही फरक नाही.शाळा सर्व चांगल्या असतात. विद्यार्थ्याने उत्तम अभ्यास केल्यास शाळा कुठलीही असू दे यश हमखास मिळते. माझे शिक्षण पालिकेच्या शाळेत झाले असून पालिका शाळेत शिक्षणाचा दर्जां उत्तम आहे असे कोमल यादव या विद्यार्थ्यीने सांगितले. यावर्षी १० वीच्या परीक्षेत ९२ टक्के मिळून पालिकेच्या शाळेतून पहिली आली. शिवसेनेच्या नगरसेविका नमिता पाटील यांनी गुरुवारी शिक्षण समिती सभापती पदभार स्वीकारला.यावेळी महापौर विनिता राणे आणि सभापती पाटील यांनी कोमलचा सत्कार केला. तसेच सभापती पाटील यांनी कोमलला आर्थिक मदतही केली. यावेळी महापौर विनिता राणे म्हणाल्या, आज कोमलने पालिकेच्या शाळेतून शिक्षण घेऊन ९२ टक्के मिळवले.
यावरून पालिकेच्या शाळेत उत्तम शिक्षण मिळत असल्याचे सिद्ध झाले आहे. गेल्या वर्षी कोमलची मोठी बहिण प्रियानेही पालिकेच्या शाळेतून १० परीक्षेत पाहिला क्रमांक मिळविला होता. तर शिक्षण समिती सभापती नमिता पाटील म्हणाल्या, अश्या विद्यार्थ्यामुळे आज पालिकेच्या शाळेतहि चांगले शिक्षण मिळत असल्याचे दिसते. खाजगी शैक्षणिक संस्थांच्या स्तरावरील शिक्षण महापालिका क्षेत्रातून देण्याचा प्रयत्न होणार आहे. शैक्षणिक क्षेत्रातील महापालिकेतून भरीव तरतूद करून त्याचा वापर विद्यार्थी विकासासाठी करताना कृती आराखडा तयार करून शैक्षणिक दर्जा व स्तर उंचावण्याचा मानस असल्याचेची सभापती नमिता पाटील यांनी सांगितले. यावेळी आमदार गणपती गायकवाड, माजी महापौर राजेंद्र देवळेकर, शिवसेना नगरसेवक, नगरसेविका, शिवसेना पदाधिकारी अरविंद मोरे यांनी नवनियुक्त सभापती नमिता पाटील यांचे अभिनंदन केले.