आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेच्या निमित्ताने भगवान ‘गौतम बुद्धां’च्या अस्थी कल्याणात
कल्याण दि.१० – समता सांस्कृतिक केंद्राअंतर्गत इंटरनॅशनल बुद्धीष्ट पिस संस्थेतर्फे कल्याणात आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या परिषदेच्या निमित्ताने म्यानमारमधून भगवान गौतम बुद्धांच्या अस्थी आणि थायलंमधील साडेसहा फुटी बुद्धांची मूर्ती दर्शनासाठी आणण्यात आल्या आहेत.
हेही वाचा :- 69व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय दालनाचे उद्घाटन
कल्याणच्या फडके मैदानात ही आंतरराष्ट्रीय धम्म परिषद होत आहे. त्याचे औचित्य साधत शनिवारी गौतम बुद्धांच्या अस्थींची आणि मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. आज दिवसभर चालणाऱ्या या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेत या अस्थी दर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत.
Please follow and like us: