डोंबिवलीत वायू प्रदूषण नसल्याचा दावा
Hits: 1
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.१२ :- शहर व परिसरात बुधवारी सकाळी ज्येष्ठ नागरिक नेहमीप्रमाणे मॉर्निंगवॉकसाठी बाहेर पडले आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येऊ लागली. यामुळे पहाटेच वायू प्रदूषण झाल्याची अफवा पसरली. मात्र कामा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दुर्गंधी येत असली तरी हे वायू प्रदूषण नाही असा दावा केला. जिजाई नगर, निवासीभाग, ठाकुर्ली या परिसरात विचित्र दुर्गंधी येत असल्याचे नागरिक सांगत होते.
हेही वाचा :- Dombivali ; लसूण-नारळावर चोरट्यांचा डल्ला
सोशल मीडियावर पण उलटसुलट चर्चा सुरू होती. पण वायूप्रदूषण असते तर नागरिकांना त्रास झाला असता पण अशा कोणत्याही तक्रारी नव्हत्या. सांडपाणी वाहून नेणाऱ्या उघड्या नाल्यातून दुर्घधी येत असल्याचे कामाचे माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी यांनी सांगितले. तर कामा संघटनेचे विद्यमान अध्यक्ष देवेन सोनी यांनी वायू प्रदूषण असले असते तर नागरिकांना डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी, आदी त्रास झाला असता.
हेही वाचा :- हिंदुत्ववादी शिवसेनेची गोची…
पण अशी कोणतीही तक्रार नव्हती. ही दुर्गंधी नाल्यातून होत असल्याचा दावा सोनी यांनी केला. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी शंकर वाघमारे यांना संपर्क केला पण संपर्क होऊ शकला नाही. तर डोंबिवली एमआयडीसी परिसरातील नाल्यातून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे शहरात दुर्गंधी पसरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.