व्यवसाय सुलभता अंमलबजावणी

नवी दिल्ली, दि.३१ – व्यवसाय सुलभतेच्या दोन बाबींवर औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभाग लक्ष ठेवून आहे. पहिली बाब, जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता अहवालात क्रमवारीत सुधारणा करणे. वर्ष 2014 मध्ये व्यवसाय सुलभतेत 189 देशांमध्ये भारत 142 व्या स्थानी होता. परिणामी भारत सरकारने सुधारणा हाती घेतल्या. जागतिक बँकेच्या 31 ऑक्टोबर 2018 ला प्रकाशित झालेल्या व्यवसाय सुलभता अहवाल 2019 मध्ये 190 देशांच्या यादीत भारत 77 व्या स्थानी आहे.

हेही वाचा :- रेल्वे अपघात रोखण्यासाठी उचलण्यात आली पावले

2014 पासून 8 निर्देशांकात भारताने 65 स्थानांची झेप घेतली आहे. दुसरी बाब व्यवसाय सुधारणा असून राज्य सरकार राबवत असलेल्या गतिविधी यात आहे. अंमलबजावणीसाठी औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभाग कृती आराखडा सामायिक करते. राज्य सरकारांशी चर्चा करून हा आराखडा तयार केला जातो. उद्योग आणि वाणिज्य राज्यमंत्री सी.आर.चौधरी यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.