नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करुन तात्काळ अहवाल पाठवा – कृषी राज्यमंत्री सदाभाउ खोत

ठाणे दि.०४ :- जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी कृषी राज्यमंत्री सदाभाउ खोत यांनी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी तालुका विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. भिवंडी तालुक्यातील महापोली,पालखणे, सुर्यानगर, विश्वगड, झिडके येथील पाहणी केली. अती वृष्टी झालेल्या शेतशिवाराची खोत यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच तलाठी, कृषीसेवक, कृषी विभाग, तालुका प्रशासनास लवकरात लवकर पिक नुकसानीचे पंचनामे तयार करून शासनास अहवाल सादर करावा, असे ते म्हणाले.

हेही वाचा :- जाता जाता परतीचा पाऊस मी पुन्हा येईन म्हणतो उद्धव ठाकरेंचा टोला

बाज़ार समिती आवारात शेतकरी व प्रशासकीय अधिकाऱ्यां सोबत बैठक घेउन संवाद साधला आणी शेतक-यांना मदतीच्या दिलासा दिला. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हानी झाली असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. हातातोंडाशी आलेले पीक या पावसामुळे उद्ध्वस्त झाले आहे.या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण राज्यातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्याचे निर्देश सर्व पालकमंत्र्यांना दिले आहेत. त्यानुसार पाहणी करून कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्या मार्फत लवकरात लवकर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे सर्वेक्षण करून अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

हेही वाचा :- संघाचे ‘समर्पण’ रूपेरी पडद्यावर

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चितपणे दिली जाणार आहे. नुकसानभरपाई तातडीने मिळावी यासाठी योजना तयार करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार शांताराम मोरे ,ज़िल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील,ज़िल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती दीपाली पाटील, विभागीय कृषि सह संचालक विकास पाटील,ज़िल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अंकुश माने, पंचायत समिति सभापति श्रीमती ज्योती ठाकरे, भिवंडी तहसीलदार शशिकांत गायकवाड़ व सर्व तालुक़ा स्तरीय अधिकारी उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email