kalyan ; राज्य उत्पादन शुल्क कल्याण विभागाने पकडली अवैद्य दारू

(म. विजय)

कल्याण दि.२८ – महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग ठाणे कल्याण अंतर्गत परराज्यातून अवैधरित्या विदेशी मद्य वाहतूक करताना वाहन चालका सहित लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वनविभाग क्षेत्र अधिकारी कार्यालय खर्डी तालुका शहापूर ,जिल्हा ठाणे मार्गे दमण येथे तयार झालेली विदेशी मद्य अवैधरित्या महाराष्ट्र राज्यात आणिली जातात. यामध्ये शासनाचा लाखो रुपये कर चुकवून काही मध्य सम्राट असे धंदे करत असतात. याचप्रमाणे खर्डी येथील दोन राज्यांना जोडणाऱ्या मार्गावर राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभाग अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण विभाग अधिकारी उत्पादनशुल्क निरीक्षक नंदकिशोर मोरे आणि सहकारी यांनी येणाऱ्या वाहनांची तपासणी करीत असताना त्यांच्या अनुभवी नजरेतून MH-43-D-8492 या वाहनाचा संशय आला. यामुळे वाहनाची कसून तपासणी केली असता.

वाहनांमध्ये विविध ठिकाणी चोरीच्या उद्देशाने लपवलेली दमण येथील विदेशी दारू राज्य शासनाचा कोणताही कर न भरता विक्री करण्यासाठी आणल्याचे निदर्शनास आले. या वाहनासोबत वाहन चालक राजकुमार वय ५२ वर्षे, राहणार ,साई व्हिला, गौरीपाडा ,कल्याण (पश्चिम )यास ताब्यात घेण्यात आले याबरोबर ५२८ मॅकडोनाल्ड नं. १ १८० मि.लि. , ४,११,२८०/- ( चार लाख अकरा हजार दोनशे ऐंशी रुपये ) मुद्देमाल जप्त करण्यात आला . तसेच वाहन चालकास अटक करून याचा मुख्य सूत्रधार कोण याची चौकशी सुरू आहे.येणाऱ्या गणेशोत्सवात सुरुवातीला मोठी कारवाई झाल्याने अवैधरित्या शासनाची फसवणूक करून मद्यविक्री करणाऱ्यांना राज्य उत्पादन शुल्क कल्याण विभाग यांनी केलेल्या कारवाईने चांगलीच धडकी भरली. या कारवाईबाबत कल्याण विभाग निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्याशी बोलले असता अशा कारवाई सोबत अवैधरित्या विनापरवानगी कोणत्याही धाब्यावर मध्य विक्री केल्यास कडक कारवाई केली जाईल असेही सांगिले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email