कॅलिडोस्कोप विभागातल्या चित्रपटांची नावं इफ्फीकडून जाहीर
Hits: 0
नवी दिल्ली :- 50 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीने उत्सव कॅलिडोस्कोप विभागात दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटांची सूची आज जाहीर केली. इफ्फीचा हा एक महत्वाचा भाग मानला जातो. आंतरराष्ट्रीय वर्तुळात गाजत असणारे ‘पॅरासाईट’, ‘पोट्रेट ऑफ अ लेडी ऑन फायर’ या चित्रपटांचा समावेश आहे.
कॅलिडोस्कोप उत्सवामध्ये जगभरातल्या अनोख्या चित्रपटांचा आस्वाद सिनेरसिकांना एकाच ठिकाणी घेण्याची संधी मिळते. या विभागात जगभरात प्रशंसेला पात्र ठरलेले 20 चित्रपट रसिकांना पाहता येणार आहेत. बोंग जून-हो दिग्दर्शित ‘पॅरासाईट’ हा चित्रपट इंडिया प्रिमीयर म्हणून दाखवला जाणार आहे. मेहदी बरसोई यांचा ‘ए सन’, नऊ आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘ॲण्ड देन वुई डान्स’ हा लेवन अकीन चित्रपट इंडिया प्रिमीयरमध्ये दाखवला जाणार आहे.