दर्गा अजमेर शरीफ येथे मुख्तार अब्बास नक्वी यांनी पंतप्रधानांच्या वतीने ‘चद्दर’ केली अर्पण

नवी दिल्ली, दि.०६ – मानवी मूल्य आणि न्याय यांच्या रक्षणासाठी सुफी संतांच्या शिकवणुकीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार आहे, मात्र दुसरीकडे ते दहशतवादाविरुद्धचे ‘राष्ट्रीयवादी लढवय्ये’ असण्याचे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे. दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेच्या धोरणाचा स्वीकार करून पंतप्रधान राष्ट्रीय सुरक्षिततेच्या प्रती कटीबद्धतेने कार्य करत आहेत, असे नक्वी म्हणाले. भारताची अध्यात्मिक आणि सूफी शिकवण ही दहशतवाद आणि हिंसेच्या इतर सर्व प्रकार नष्ट करून मानवता आणि शांतता प्रस्थापित करण्याची हमी आहे असे नक्वी यांनी सांगितले. अजमेर शरीफ येथे 807 व्या ऊर्स निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने नक्वी यांनी सुफी संत हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती दर्ग्यावर चादर अर्पण केली. तसेच ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती यांचे भारतातील आणि परदेशातील अनुयायींना वार्षिक ऊर्स निमित्त शुभेच्छा देणारा पंतप्रधानांचा संदेशही वाचून दाखवला. ‘विविध धर्म, समाज, समजुती आणि विश्वास यांचे सौहार्दपूर्ण सहजीवन हे आपल्या देशाचे सौंदर्य आहे.

हेही वाचा :- देशभरात 7 मार्च 2019 ‘जनऔषधी दिवस’ म्हणून साजरा करणार

आपल्या देशातील अनेक संत, पीर आणि फकीर यांनी शांतता, एकात्मता संदेश वारंवार दिला आहे. शिस्त, सभ्यता आणि सुसंवाद या शिकवणुकीचा प्रसार करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती हे भारताच्या महान अध्यात्मिक परंपरेचे प्रतीक आहे. त्यांच्या मानवतेच्या सेवेमुळे अनेक भावी पिढ्यांना प्रेरणा मिळत राहील. या महान सूफी संताच्या वार्षिक ऊर्स निमित्त मी दर्गा अजमेर शरीफ वर अर्पण करण्यासाठी चद्दर पाठवून मी आदरांजली अर्पण करतो आहे’, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. समाजाच्या सर्व स्तरातील लोकांनी पंतप्रधानांनी अर्पण केलेल्या चद्दरचे मनापासून स्वागत केले. भारत आता सुरक्षित ताहांमध्ये असल्याचे नक्वी यांनी यावेळी सांगितले. देशाच्या सुरक्षिततेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखालील देश आणि देशवासियांसंदर्भात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. दहशतवादी संघटना आणि लोक इस्लामचा सुरक्षा कचव म्हणून उपयोग करणारे इस्लामचे सर्वात मोठे शत्रू आहेत असे नक्वी यांनी सांगितले. सामाजिक सलोखा आणि सौहार्द यांची ही वीण अधिक मजबूत करायला हवी. गरीब नवाझ यांचे आयुष्य आपल्याला सामाजिक आणि जातीय सलोख्याप्रती कटीबद्धता अधिक मजबूत करण्यासाठी देते असे नक्वी म्हणाले. यावेळी नक्वी यांनी ख्वाजा गरीब नवाझ विद्यापीठाच्या कोनशिलेचे अनावरण केले. तसेच अजमेर येथे बाह्य रुग्ण विभागाचे उद्‌घाटनही केले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email