ऑपरेशन डिजिटल बोर्डचा शुभारंभ
नवी दिल्ली, दि.२१ – केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्ली येथे ऑपरेशन डिजिटल बोर्डचा शुभारंभ केला. ऑपरेशन डिजिटल बोर्ड क्रांतिकारी पाऊल असल्याचे जावडेकर यांनी यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यामुळे शिकण्याची आणि शिकवण्याची प्रक्रिया संवादात्मक आणि आवडीची होईल.
हेही वाचा :- “ऊर्जा आणि पर्यावरण: आव्हान आणि संधी” आंतरराष्ट्रीय परिषदेचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
देशातल्या सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये इयत्ता 9 वी पासूनच्या इयत्तांमध्ये डिजिटल बोर्ड असेल, असे जावडेकर यांनी सांगितले. या प्रक्रियेला 2019 च्या आगामी सत्रापासून सुरुवात होईल, असे ते म्हणाले. ऑपरेशन डिजिटल बोर्डसाठी विद्यापीठ अनुदान आयोग कार्यान्वयन संस्था असेल. वर्ष 2022 पर्यंत देशातल्या प्रत्येक वर्गापर्यंत डिजिटल शिक्षण पोहोचवण्यासाठी आयोगाने 29 जून 2019 ला ठराव मंजूर केला आहे.